गडचिरोलीविदर्भ

कार्मेल कॉन्व्हेंटजवळ ट्रकच्या चाकात सापडून दोन युवक ठार

देसाईगंजमध्ये ट्रक-दुचाकींचा अपघात

देसाईगंज : तालुक्यातील देसाईगंज ते लाखांदूर मार्गांवरील कार्मेल कॅान्व्हेंटजवळ रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडलेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार युवकांना प्राण गमवावे लागले. अनिकेत ईश्वर आदे (21 वर्ष) रा.नवीन लाडज आणि शैलेश शालिक मेश्राम (23 वर्ष) रा.जांभुळखेडा ता.कुरखेडा अशी मृतांची नावे आहेत.

अनिकेत हा आपली कामे आटोपून देसाईगंजवरून दुचाकीने आपल्या गावी (नवीन लाडज) या जात असताना देसाईगंजवरून लाखांदूरकडे जाणाऱ्या ट्रकने (सीजी 04, एलएस 2458) त्यांना धडक दिली. यात अनिकेत जागीच ठार झाला. याचवेळी लाखांदूरकडून येणाऱ्या शैलेश शालिक मेश्राम (23 वर्ष) रा.जांभुळखेडा, तालुका कुरखेडा यालाही ट्रकचा कट लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. देसाईगंज पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रकला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान आ. कृष्णा गजबे यांची उपजिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button