
कोरची : परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आणि दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज कोरची येथे बौद्ध समाजाच्या वतीने निदर्शने करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निदर्शनात प्राचार्य देवराव गजभिये, किशोर साखरे, गिरीधारी जांभुळे, तुलसी अंबादे, चेतन चौधरी, विनोद भोयर, महेश लाडे, रवींद्र भैसारे, ईश्वरलाल साखरे, छाया साखरे, विठ्ठल भैसारे, जयंत साखरे, विकास सहारे, मोहन सहारे, गुलाब भैसारे, महेश टेंभुर्णे, विकास चौधरी, हेमलता भैसारे, ज्योती भैसारे, जया सहारे, दीक्षा भैसारे, मनोज टेंभुर्णे, संध्या मेश्राम, शोभा साखरे, सुमित्रा भैसारे, प्रभाकर क-हाडे, श्रीदेवी शहारे, छगन चौधरी, बुधाराम सहारे, अरुण सहारे, पांडुरंग उंदिरवाडे, शर्मिला वालदे, नेहा सहारे, प्रेमिला अंबादे, पुष्पा साखरे, पंढरी उंदिरवाडे, शशिकला लाडे, सुमित्रा उंदिरवाडे, अशोक कऱ्हाडे, आनंदराव मेश्राम, अरुण उंदिरवाडे, संजीवनी उंदिरवाडे, मनोज अग्रवाल यांच्यासह बौद्ध समाजातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी तहसीलदार प्रशांत गड्डम यांना निवेदन दिले.
भारतीय संविधानावरच भारताची लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकून आहे. त्यामुळे संविधानाच अपमान हा देशाचाच अपमान असल्याने दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.



