
एटापल्ली : केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डुम्मे येथे नुकत्याच संपन्न झाल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवेली कबड्डी स्पर्धेत विजयी ठरली.
प्राथमिक विभाग मुली खो-खो व कबड्डी मध्ये प्रथम, प्राथमिक विभाग मुले कब्बडी मध्ये प्रथम क्रमांक व मुली द्वितीय क्रमांक घेऊन जवेली शाळा विजयी ठरली आहे. सर्व विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आणि तालुकास्तरीय साठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती व समस्त गावकऱ्यांना दिले आहे.
शालेय स्तरावर या क्रिडा स्पर्धांना महत्त्व असते विध्यार्थ्यांमधील क्रिडा गुणांना वाव मिळण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असतात. त्यात एटापल्ली तालुक्यातील जवेली शाळेने दमदार कामगिरी बजावली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा डुम्मे येथे ११ ते १२ डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. शाळेतील चमू शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापकांनी अभिनंदन करुन मुलांचा उत्साह वाढविला.



