क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; युवकाला अटक

कोरची येथील घटना

कोरची : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोरची येथे बुधवारी(ता.१) घडली. या प्रकरणी कोरची पोलिसांनी मनिष भोयर (२१) रा. कोरची यास अटक केली आहे.

पीडित मुलीचे आई-वडील कर्नाटक राज्यातील विजयवाडा येथे एका कंपनीत मजुरीसाठी गेले होते. त्यामुळे त्यांनी मुलीला आपल्या मावशीकडे ठेवले होते. बुधवारी रात्री मावशी कामात असताना आरोपी मनिष तिच्या घरी गेला. ‘तुझा काका बोलावत आहे’, अशी खोटी माहिती सांगून त्याने तिला आपल्या घराकडे नेले. त्यानंतर तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती आपल्या मावशीच्या घरी परतली. रक्ताने माखलेले कपडे बघून मावशीने विचारणा केली. मात्र, ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी रडत रडत तिने आपबिती सांगितली.

याप्रकरणी तक्रारीनंतर शुक्रवारी(ता.३) कोरची पोलिस ठाण्यात आरोपी मनिष भोयर याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कोरची पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेंद्र ठाकरे तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button