गडचिरोलीविदर्भ

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मंडलपूर येथील मल्लिकार्जुन स्वामी यात्रेसाठी आर्थिक मदत

सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

सिरोंचा : येथून जवळच असलेल्या मंडलपूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री मल्लीकअर्जुन स्वामीचे यात्रा (बोनालू) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या बोनालू (यात्रेकरिता) अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली.

या (बोनालू) कार्यक्रमाला सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे पदाधिकाऱ्यांनी मंडलपूर येथील श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिराला भेट देऊन स्वामीचे विधिवत पूजा करून स्वामीचे आशीर्वाद घेतले. “श्री मल्लिकार्जुन स्वामी हे आमच्या गावात असून आम्ही या स्वामीचे गेल्या शंभर वर्षांपासून पूजा करत असल्याची माहिती मंदिराचे पुजारी शंकर तुमनुरी यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बानय्या जनगाम, सरपंच सारक्का जाका, उपसरपंच रवी संतोषपू, सरपंच अजय आत्राम, राजू संतोषपू, तिरुपती पोट, मंदिर पुजारी शंकर तुमनुरी, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, गणेश राच्चावार, लक्ष्मण बोल्ले, रमेश सुव्वा, निरंजन भंडारी, रमेश इरला, राजबापू गुडा, राजू बिरेली, रमेश गंड्राकोटा, लचूलू गग्गूरी, समय्या परसाबोईना, दुर्गाय्या पेद्दाबोइना, राकेश बिरेल्ली, सुरेश बद्दी, मधुकर गांगनबोइना, मलाय्या बिरेली, संपत्ती बिरेली, मलाय्या राजारापू, गड्डम बापू, राजन्ना राजारापू, मारान्ना उडता, लक्ष्मण सुव्वा, गणेश भंडारीसह मंडलपूर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button