
एटापल्ली : तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल ला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्याने ०८ डिसेंबर रोजी दवाखान्याच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली सारख्या अतिदुर्गम भागातील जनसमुदायाच्या दूरवर दवाखान्याचा संबंध येत नसल्याने लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड आयर्न ओर माइन्स सुरजागडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून सुरजागड खाण परिसरातील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलची निर्मिती करून परिसरातील सर्व जनसमुदायाला निःशुल्क सेवा सुरू केली. आतापर्यंत 30 खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुरेशा व्यवस्थापनासह समाजातील सर्व घटकांना सर्व मुलभूत आणि अत्याधुनिक सेवा पुरविते, उपलब्ध सुविधा पैकी प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, जनरल सर्जन जनरल मेडिसिन, त्वचारोगतज्ज्ञ भूलतज्ज्ञ कान नाक घसा विशेषज्ञ, चिकित्सक, आहारतज्ञ, अतिदक्षता विभाग मध्ये एनआयसीयू, बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभाग करिता एकूण १२ अनुभवी व तज्ञ डॉक्टर यांचेकडून उपचार व ४० कौशलीपूर्ण नर्स व सहकारी स्टाफ याद्वारे तीन पाळी मध्ये २४ तास कार्यरत. निदान सुविधा मद्ये पाथोलाजी, सोनोग्राफी स्त्रियांसाठी डिजिटल एक्सरे, ईसीजी टीएमटी, स्पायरोमेट्री, ऑडिओमेट्री, वैदू चिकित्सालय – नैसर्गिक पद्धतीने उपचार, तसेच गावातील वैद्य याद्वारे उपचार व मार्गदर्शन.
एक वर्षामध्ये ६१,००० हजाराहून अधिक रुग्ण या हॉस्पिटलद्वारे उपचार घेतलेले आहेत. तसेच शंभरच्यावर यशस्वी प्रसूती या दवाखान्यात झालेले आहेत. बाह्यरुग्ण विभाग ओपीडी दर सोमवार ते शनिवार सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत, तसेच आपत्कालीन सेवा 24 तास उपलब्ध. अतिरिक्त सेवा म्हणून ग्रामपंचायत पूरूसलगोंदी, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा, ग्रामपंचायत पूरूसलगोंदी, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील गर्भवती महिला यांना तपासणी व प्रसूती साठी मोफत ॲम्बुलन्स 24 तास सेवा. ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील कुपोषित मुले व मुली कुपोषणमुक्त बालक कार्यक्रम अंतर्गत दवाखान्यामध्ये उपचार व आहार पुरवठा. ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील लोकांना सिकलसेल, एनेमिया, मलेरिया, हिवताप बाबत मोफत उपचार व मार्गदर्शन. सर्व गावामध्ये प्रथम उपचार पेटीद्वारे तात्काळ उपचार व माहिती देणे. गावातील महिला व किशोर वयातील मुली यांना सखी-सहेली कार्यक्रम अंतर्गत एकूण 2216 मुली व महिला मोफत सॅनिटरी पॅड वितरण करून जनजागृती केलेली आहे. सदर परिसरात निःशुल्क सेवेत असलेल्या सर्व जनतेला या दवाखान्याचा एकदम सोयी सुविधा नी आरोग्य सेवा घेत असल्याने लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलची सर्वत्र चर्चा होत आहे.
०८ डिसेंबरला याच निःशुल्क आरोग्य सेवेला एक वर्ष पुर्ण झाल्याने लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दवाखान्यात एक वर्ष पूर्ण निःशुल्क मोफत सेवा देणारे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ सोबत सर्व कर्मचाऱ्यांचे शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले. यासोबतच सर्व तीन ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि गाव पाटील यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला पुरसलगोंदीच्या सरपंच अरुण सडमेक, उपसरपंच राकेश कवडो, नागुलवाडीच्या उपसरपंच राजू तिम्मा, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, साई कुमार, भोलू सोमनानी, संजय चांगलाणी, डॉ. सनी सलूजा, वेदांत जोशी, रोमित तोमबर्लावार, टी.ए. बास्कर, राम कुमार, अरुण रावत, सुनीता मेहता, विक्रम मेहता, पोलीस उपनिरीक्षक दुल्हत, डॉ. गोपाल रॉय, डॉ. चेतन बुरिवार, डॉ. प्रीती बुरिवार, हेडरीचे माजी उपसरपंच कटिया तेलामी, लालसाय तलांडे, मधुकर सडमेक, नागुलवाडीचे पोलीस पाटील माधव गावडे, दस्साजी कोरामी, लालसुजी रापणजी, बेंजामिन टोप्पो, संजय जेट्टी, दिनेश पुंगाटी, विनोद नरोटी, देऊ पुंगाटी, साधूजी गुंडरू, झुरू कावडो, गोसुजी हिचामी, पेकाजी गुंडरू, बिरजू गावडे, संभाजी गोटा, रैनु नरोटे, नितीन तोडेवर, बाजू मट्टामी, मुन्ना पुंगाटी, कल्पना आलम, झुरु गोटा, देवजी कवडो, लाचु हेडो, मंगू कलमोती, अशोक हिचामी, बाजी गुंडरु, रामजी गुंडरु बांडे आणि लॉयड्सचे अधिकारी/कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



