गडचिरोलीविदर्भ

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची ब्रेन मलेरियाग्रस्त महिलेला आर्थिक मदत

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोठी येथील रहिवासी अतिदुर्गम भागातील ममता शोबु गोटा रा. कोठी ही महिला ब्रेन मलेरिया ग्रस्त असल्याने तिला अहेरी ग्रामीण रुग्णालय येथून चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. पण तिच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही. सदर महिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय वार्ड क्रमांक तीन बेड नंबर 37 येथे भरती आहे, आवश्यक माहिती अभावी व योग्य उपचार अभावी सदर महिलेचे आप्तेष्ट बऱ्याच ठिकाणी फिरत होते.

त्यांचे कुटुंब सध्या खूप आर्थिक विवंचनेत होते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांना ही बातमी कळताच त्यांनी आपल्या दानशूर पणाचा परिचय देऊन या विषयाची दखल घेतली व आवश्यक उपचाराचा खर्च देण्याचे कळविले व त्यांचे आप्तेष्ट यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे थेट संपर्क साधला व यानंतर पुन्हा काही मदत लागल्यास आपण सर्वतोपरी मदत करू व आमचे लक्ष नक्कीच या महिलेकडे राहील असे आश्वासन दिले. याबद्दल राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे रुग्ण महिलेचे आप्तेष्ट यांनी व अहेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button