गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

कॉम्प्लेक्स भागातील फुटपाथधारकांना गाळे उपलब्ध करून द्या

फुटपाथ दुकानदार संघटनेची मागणी

गडचिरोली : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील न्यायालय चौक ते लाजेंडापर्यंत असलेल्या फूटपाथ दुकानदारांना नगर परिषद प्रशासनाने गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी फूटपाथ दुकानदार संघटनेने केली आहे.

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील २५ ते ३० वर्षांपासून अतिक्रमण करून छोटे मोठे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने छोटे व्यवसाय करून जीवन जगावे लागते. परंतु, ३० मे रोजी नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण मोहीम राबवून संपूर्ण फूटपाथवरील दुकाने हटविल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फूटपाथधारकांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत विविध बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे. घेतलेले कर्ज फेड कसे करायचे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकानाचे गाळे उपलब्ध करावे, अशी मागणी केली आहे.

निवेदन देताना न.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, फूटपाथ दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग जनबंधू, उपाध्यक्ष भाऊराव भगत, कार्याध्यक्ष नंदेश्वर, सहसचिव भाष्कर सहदेवकर, कोषाध्यक्ष पठाण यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button