गडचिरोलीविदर्भ

केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख कामकाजावर महायुतीचे सरकार येणारच – माजी खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

अहेरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान असतांना अनेक विकासाभिमुख कामे करत नागरिक जनतेपर्यंत अनेक योजना अंमलात आणुन विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन काम केले. याबरोबरच महिला भगिनींच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महिलांसाठी आणली, असे अनेक योजना लोकोपयोगी सरकार राबवित आहे. मागील दहा वर्षात माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केलेली आहे. जसे रेल्वे वडसा गडचिरोली तसेच रेल्वेचे जिल्ह्यात ब्रॉडगेज सर्व्हे लाईन मंजुर, चिचडोह, कोटगल बँरेजे, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ निर्मिती, सुरजागड लोह प्रकल्प, कोनसरी प्रकल्प तसेच साडे चौदा हजार कोटीचे विविध रस्त्यांची कामे, असे अनेक विकासात्मक कामे केले आहेत. ऐवढे विकासकामे करूनसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना सांगण्यात आपण कमी पडलोय का? यांची खंत व्यक्त करत विरोधकांनी संविधान, तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडेआठ हजार असा खोटानाटा अपप्रचार करत मतदारांची दिशाभुल केले. पण आता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजय आपलाच होईल, विधानसभेच्या निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामावर महायुतीचेच सरकार येईल, असे प्रतिपादन माजी खा. अशोक नेते यांनी केले. अहेरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा निवडून आणण्याचा संकल्प करावा, असेही ते म्हणाले.

भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम याना नुकतीच अहेरी विधानसभा क्षेत्रातुन महायुतीचे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानिमित्तानेे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली व  माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच निवडणूक विधानसभा संचालन समितीचे सहसंयोजक अशोक नेते यांच्या मार्गदर्शनातील प्रमुख उपस्थितीत तसेच अहेरी या विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे सन्मानित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भव्य महायुतीची बैठक मेळावा वासवी सेलिब्रेशन हाँल अहेरी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी मंचावर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, प्रदेश कार्यकारणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मदने, राष्ट्रवादीचे नेते रियाज शेख, हर्षवर्धन आत्राम, राष्ट्रवादी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, राष्ट्रवादीचे नेते रिंकु पापडकर, तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम, युवा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार, विजय नर्लावार, बाबुराव गंफावार, विनोद आकनपल्लीवार, सुनील विश्वास, सागर डेकाटे, शिवसेनेच्या नेत्या पौर्णिमा इष्टाम, अंकुश मंडल, तसेच महायुतीचे सन्मानित मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button