सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रेखा बाळेकरमकर मदर टेरेसा पुरस्काराने सन्मानित

गडचिरोली : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रेखा बाळकृष्ण बाळेकरमकर यांना नई दिल्ली येथे मदर टेरेसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
10 नोव्हेंबर रोजी भारताची राजधानी नई दिल्लीत ग्लोबल लिडरशिप, समीट, अवॉर्ड सेरेमनी महिला सशक्ती कारणासाठी स्वर्ण भारत संस्थेचे अध्यक्ष डॉ. पीयुष पंडित यांच्या मार्गदर्शनात इस्लामिक कल्चरल सेंटर विविध श्रेत्रात काम करणाऱ्या 101 महिलांना सन्मानित करण्यात आले. समाजात महिलांना सुरक्षा, झाडे लावा झाडे जगवा, आपली सुरक्षा यावर प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमात सिंगापुर, जपान, रशिया, लंडन, थायलंड, इंडोनेशिया येथुन अतिथी आले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन डॉ. रेखा बाळकृष्ण बाळेकरमकर यांना डॉ. मेरी येंग, विसेंट येंग सिंगापुर यांच्या हस्ते मदर टेरेसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याआधी त्यांना सामाजिक कार्यात डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.



