
गोंदिया : कारगिल विजय दिवस व सैनिक मेळावा असा संयुक्त कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया अंतर्गत असलेल्या कल्याणकारी सुविधा व अन्य सुविधांबाबत विस्तृत माहिती देण्यात येईल तसेच माजी सैनिकांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडिया येथील प्रतिनिधीद्वारे माजी सैनिकांना डीएसपी अकाऊंट अंतर्गत असलेल्या सुविधा बद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था पुणे यांचेद्वारे सैन्यदलात अधिकारी पदाकरीता प्रवेश घेणे आणि युपीएससी परीक्षेची तयारी करण्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येनी माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता यांनी उपस्थित राहून सैनिक मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील यांनी केले आहे.



