
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आदेश जारी
गडचिरोली : जिल्ह्यासाठी २०२५ या वर्षातील तीन स्थानिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी २४ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, पोळा, घटस्थापना आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पोळा (पहिला दिवस): शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५, घटस्थापना: सोमवार, २२ सप्टेंबर २०२५, नरक चतुर्दशी (दिवाळी): सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना लागू असतील. मात्र, या सुट्ट्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालये तसेच बँकांना लागू नसतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.



