गडचिरोलीविदर्भ

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नरेंद्र उंदिरवाडे यांचे यश

गडचिरोली : नुकताच गडचिरोली तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनी आटोपली त्यात गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे नरेंद्र उंदिरवाडे यांना प्रयोगशाळा सहाय्यक गटामधून प्रायोगिक शैक्षणिक साहित्य निर्मिती करीता प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

शिक्षण विभाग गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली येथील कमलाताई मुनघाटे विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्याभारातून विविध गटामध्ये अनेक वैज्ञानिक उपकरणे सादर करण्यात आले होते. त्यातच प्रयोगशाळा सहाय्यक गटातील शैक्षणिक/प्रायोगिक साधन निर्मितीमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे नरेंद्र उंदिरवाडे यांनी ‘लॅब विथ फन सायन्स’ या प्रायोगिक साधनाचे सादरीकरण केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

विजेत्या स्पर्धकाला संस्थेचे सदस्य सुरेश लडके, प्राचार्या स्मिता लडके, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक देवतळे, संगीता खोब्रागडे व मान्यवर यांच्या हस्ते फुलझाड, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्याचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button