गडचिरोलीविदर्भ

सामाजिक कार्यकर्ते सागर निंबोरकर यांच्यासह शेकडो युवांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपामध्ये नवचैतन्याचा संचार! : विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पक्षप्रवेश

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सोमवारी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात काँग्रेसला मोठा धक्का देत सामाजिक कार्यकर्ते सागर अरुण निंबोरकर यांच्यासह शेकडो युवा आणि महिलांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश करून भाजप परिवारात नवऊर्जेचा संचार केला.

या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर होते, तर माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सहकार महर्षी प्रकाश पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गिता हिंगे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली शहरातील नावाजलेले, सामाजिक कार्यकर्ते सागर अरुण निंबोरकर यांनी काँग्रेसचा मोठा राजकीय आधार बिंदू खिळखिळा करत भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, युवा व महिला भगिनींनीही पक्षाचा दुपट्टा स्विकारत विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याची घोषणा केली.

नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी भाजपच्या विचारधारेवर भाष्य केले. डॉ. कोठेकर म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय संघटना नसून राष्ट्रनिर्मितीचे महान आंदोलन आहे. मोदीजी व फडणवीसजींच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेकडे झेपावत आहे. गडचिरोलीतील या उत्साहवर्धक पक्षप्रवेशामुळे भाजप परिवार अधिक सबळ आणि जनतेच्या विश्वासाशी घट्ट जोडला गेला आहे.”

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या विकासधर्माला अनुसरून गडचिरोलीच्या सर्वांगीण प्रगतीच्या अभियानाला या नव्या प्रवेशामुळे नव्या उमेदीने गती मिळणार असल्याचा ठाम विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. सागर निंबोरकर यांच्यासह शेकडो युवांचा झालेला हा प्रवेश गडचिरोलीच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडवून आणणार असून, भाजपच्या विस्ताराच्या नव्या अध्यायाची ही प्रभावी सुरुवात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button