गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजमध्ये विश्वमांगल्य सदाचार सभेच्या बैठकीत महिला नेतृत्वाचा जागर

महिलांच्या सदाचार, सामाजिक सहभाग आणि नेतृत्वविकासाचा उत्साही संकल्प

देसाईगंज : “संस्कार, सामर्थ्य, सदाचार व सेवा” या तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून, विश्वमांगल्य सदाचार सभा, शाखा आरमोरीच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी देसाईगंज येथे एका उत्साही नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य महिलांच्या नेतृत्वविकासाला आणि सामाजिक सहभागाला दिलेले नवसंजीवन ठरले.

विदर्भ प्रांत जनप्रतिनिधी सविता संजय पुराम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. त्यांनी महिलांना सामाजिक कार्यात सक्रिय होण्याचे आणि नैतिकतेची भावना जागृत करण्याचे आवाहन केले. सविता पुराम म्हणाल्या, “संस्कार, सामर्थ्य आणि सदाचार हे विश्वमांगल्य सभेचे मूलतत्त्व असून, समाजात निष्ठा, नैतिकता आणि सेवा भावना जागृत करणे हीच या सभेची खरी दिशा आहे.” योगीता प्रमोद पिपरे यांनी मार्गदर्शन करताना, “महिलांची सामाजिक संघटना हीच परिवर्तनाची खरी शक्ती आहे. प्रत्येक घराघरात सदाचार आणि सेवा भावना रुजावी, हे आपले उद्दीष्ट असले पाहिजे,” असे सांगितले. विद्या कृष्णा गजबे यांनी नमूद केले की, सदाचार संस्कारातून समाजातील प्रत्येक घटकात एकात्मतेची भावना जागृत होते.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष शालु दंडवते, माजी जिल्हा परिषद सदस्या रोशनी पारधी, प्रभा ढोरे, वर्षा कन्नाके, बेबी नंदा पाटील, प्रतिमा उके, अश्विनी कांबळे, शीला सोनकोतरी, गिरजा कोरेटी, संगीता कोरेटी, समुना काटेंगे, केवरा सोनफुल, जोशना लुटे, जोशना बुराडे, हेमा कावळे, फातिमा पठाण, जोशना गडे, डॉ. रूपाली कावळे, यांसह आरमोरी क्षेत्रातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उपस्थित महिलांनी सक्तीगानाच्या सामूहिक गायनातून एकसंधतेचा संदेश दिला. या बैठकीत नव्या सामाजिक उपक्रमांसाठी आणि महिलांच्या सक्रिय सहभागासाठी पुढील धोरण ठरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी पारधी यांनी, तर आभार प्रदर्शन भाजपा महिला तालुकाध्यक्ष अर्चना ढोरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button