चंद्रपूरविदर्भ

भाजप महायुतीच्या विजयासाठी आढावा बैठक : माजी खा. अशोक नेते यांचे मार्गदर्शन

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी माजी खा. तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीची आढावा बैठक भोलेनाथ राईस मिल, कापसी येथे पार पडली.

यावेळी प्रा. अतुल देशकर (माजी आमदार व विधानसभा प्रमुख) यांच्यासह विधानसभा संयोजक संतोष तंगडपल्लीवार, तालुकाध्यक्ष अर्जुन भोयर, ता. महामंत्री सतिश बोम्मावार, ता. महामंत्री सचिन तंगडपल्लीवार, विनोद धोटे, तुकाराम ठिकरे, शरद सोनवाने, सावलीचे निखिल सुरमवार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

माजी खा. नेते यांनी ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीचा संपुर्ण भाजपा पदाधिकाऱ्यांसह आढावा घेत मार्गदर्शन करताना ब्रह्मपुरी विधानसभा जिंकण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णा सहारे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक बूथ कार्यकर्ता यांनी सज्ज राहत संघटनात्मक एकजुटीने मतदारांचा विश्वास निर्माण करत भाजप महायुतीचे उमेदवार कृष्णाभाऊ यांना निवडून आणुया व ब्रह्मपुरीत नवा इतिहास घडवण्याचा निर्धार करुया असे आवाहन केले.

माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी भाजपा महायुतीचे सर्वसमावेशक नेतृत्व आणि विकासनिष्ठ धोरणे लोकांपर्यंत नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button