गडचिरोलीविदर्भ

होलसेल दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करा – तहसीलदार किशोर बागडे निर्देश

भामरागड तालुका समितीच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील व्यसनाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याकरिता ग्रामीण व शहरी भागातील होलसेल अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश मुक्तीपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार किशोर बागडे यांनी दिले.

भामरागड तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका स्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गटशिक्षणाधिकारी जनार्धन वडलाकोंडा, पो.उ.नि. धनश्री सगने, प्रमोद करपते, समुपदेशक आनंद गावडे, उमेद तालुका व्यवस्थापक दिलिप कवडो, तालुका संघटक किशोर मल्लेवार,  गणेश्री इटलवार, स्पार्क कार्यकर्ता सुरेश आसम यांच्यासह इतर सर्व विभागचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय दारू व तंबाखूमुक्त करणे, शहरातील व गावातील अवैध दारू व तंबाखू विक्री बंद करण्यासाठी पथक तयार करून कारवाई करणे, शहरातील अवैध होलसेल दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणे, तालुक्यातील सर्व शाळा व शालेय परिसर तंबाखूमुक्त करणे, गावात महिलामधील तंबाखू व खर्रा खाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला शक्तीपथ कार्यक्रम घेणे, महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीचे युवा शक्तीपथ संघटन तयार करून व्यसनमुक्त युवा संकल्प राबविणे, नागरिकांचे दारू पिण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात तसेच गावात गाव पातळी व्यसन उपचार शिबीर आयोजित करणे. या विषयावर सविस्तर चर्चा करून कृती कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश तहसीलदार बागडे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button