गोंदियाविदर्भ

बिलासपूर-झारसुगुडा रेल्वे जोडणी कामामुळे २६ गाड्या रद्द, महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या प्रवाशांना फटका

२३ ते ३० ऑगस्ट दरम्यान काम; काही गाड्यांचे मार्ग बदलले, तर काही अंशतः रद्द

गोंदिया : बिलासपूर रेल्वे मंडळाअंतर्गत बिलासपूर-झारसुगुडा विभागात तिसऱ्या व चौथ्या रेल्वे जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे २३ ते ३० ऑगस्टदरम्यान छत्तीसगडमार्गे धावणाऱ्या २६ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, बिहार आणि तेलंगणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही निश्चित स्टेशनपर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

बिलासपूर रेल्वे मंडळाने रद्द केलेल्या २६ गाड्यांमध्ये प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. १८११३ टाटानगर-बिलासपूर एक्स्प्रेस: २३ ते २६ ऑगस्ट, १८११४ बिलासपूर-टाटानगर एक्स्प्रेस: २४-२७ ऑगस्ट, २०८२२ सांतरागाछी-पुणे एक्स्प्रेस: २३ ऑगस्ट, २०८२१ पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेस: २५ ऑगस्ट, १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस: २२ ऑगस्ट, १२८६९ मुंबई-हावडा एक्स्प्रेस: २४ ऑगस्ट, १७३२२ जसीडीह-वास्को-द-गामा एक्स्प्रेस: २५ ऑगस्ट, १७००५ हैद्राबाद-रक्सोल एक्स्प्रेस: २१ ऑगस्ट, १७००६ रक्सोल-हैद्राबाद एक्स्प्रेस: २४ ऑगस्ट, १२१०१ कुर्ला-शालीमार एक्स्प्रेस: २३, २५, २६ ऑगस्ट, १२१०२ शालीमार-कुर्ला एक्स्प्रेस: २५, २७, २८ ऑगस्ट, रायगड-बिलासपूर मेमू: २४-२७ ऑगस्ट, गोंदिया-झारसुगुडा-गोंदिया पॅसेंजर: २४-२७ ऑगस्ट या गाड्या रद्द झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

याव्यतिरिक्त, काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. १२२२२ हावडा-पुणे दुरंतो: २३ ऑगस्ट रोजी बदललेल्या मार्गावरून धावेल. १२२२१ पुणे-हावडा दुरंतो: २५ ऑगस्ट रोजी बदललेल्या मार्गावरून धावेल. काही एक्स्प्रेस ट्रेन्स बिलासपूर-रायगड किंवा बिलासपूर-झारसुगुडादरम्यानच धावणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना पुढे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button