गोंदियाविदर्भ

धावत्या ऑटोरिक्षावर कोसळले झाड ; सुदैवाने जीवितहानी टळली

गोंदिया-कोहमारा महामार्गावर २ तास वाहतूक ठप्प

गोरेगाव : गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर वाघदेव मंदिर ते मुरदोली गेटच्या दरम्यान शुक्रवारी (दि. २६) दुपारी ४ वाजताच्या सुमारास एक मोठी दुर्घटना होता होता टळली. रस्त्याच्या कडेला असलेले एक झाड अचानक धावत्या ऑटोरिक्षावर कोसळले. या अपघातात ऑटोरिक्षा चालक किरकोळ जखमी झाला, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

झाड कोसळल्याने ऑटोरिक्षाच्या पुढील भागाचे नुकसान झाले. सुदैवाने प्रवासी ऑटोमध्ये नसल्याने मोठी दुर्घटना टळली. झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर पडलेले झाड तातडीने बाजूला करण्यासाठी स्थानिक गावकरी आणि वन विभागाने एकत्र येऊन मदत केली. त्यांच्या तत्पर सहकार्यामुळे अखेर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button