गडचिरोलीविदर्भ

शांतिग्राम महिला संघटनेकडून 12 ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम महिला संघटना व मुक्तीपथ तालुका टीमने संयुक्त कृती करीत बोरी गावालगतच्या जंगलपरिसरात मिळून आलेला 12 ड्रम मोहफुलाचा सडवा व दारू गाळण्याची साहित्य नष्ट केले. या कृतीमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

शांतिग्राम येथे अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांनी शर्थीचे प्रयत्न केले. मुक्तीपथ च्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम व अहिंसक कृती करून गावातून अवैध दारू हद्दपार केली. मागील वर्षभरापासून गावात अवैध दारूविक्री पूर्णतः बंद आहे. अशातच बोरी गावालगतच्या जंगल परिसरात दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळताच शांतिग्राम येथील महिला व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान, विविध ठिकाणी 12 ड्रम सडवा व साहित्य मिळून आले. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून दारूविक्रत्यांचे मोठे नुकसान करण्यात यश आले. तसेच शांतिग्राम येथे चोरट्या मार्गाने दारूविक्रीचा प्रयत्न करीत असलेल्या दोन संशयित व्यक्तीच्या घरी महिलांनी पाहणी केली व अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली. आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी महिलांकडून अथक परिश्रम घेतले जात आहे.

या कृतीमध्ये मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, अर्चना बैरागी सरपंच, रंजिता रॉय माजी सरपंच, संदीपा घरामी मुक्तिपथ संघटना अध्यक्ष, संगीता शिल संघटना सचिव, कल्पना मंडल, सुमित्रा मिस्त्री, तिलोका गाईन, रिम्पा अधिकारी, गोकुल मिस्त्री, सुगंधा बिश्वास, पुष्पा हलदार, सपना मोदक, सुषमा हलदार, कल्पना दास यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button