गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत ‘जॉब शिक्षण कन्सल्टिंग’च्या नव्या शाखेचे उद्घाटन

गडचिरोली : विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जॉब शिक्षण कन्सल्टिंगच्या गडचिरोली येथील नव्या शाखेचे उद्घाटन 29 जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या नव्या शाखेचे उद्घाटन शहरातील प्रख्यात सर्जन व सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. यशवंत दुर्गे, ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऋषिकेश बरडे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. बाळू सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आज तकचे प्रतिनिधी व्येंकटेश दुडमवार, डायरेक्टर शर्मा, गडचिरोली शाखेचे मालक सिद्धार्थ बलराजू नरहरी, चेतन उरकुडे, कुणाल वर्धलवार, सुनील मेश्राम, सौरभ म्हशाखेत्री, छगन बेंडवार तसेच परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमारे 100 हून अधिक उपस्थितांना शिक्षण व करिअर मार्गदर्शनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ‘जॉब शिक्षण’तर्फे NEET, JEE, MHT-CET व इतर प्रवेश परीक्षांसाठी समुपदेशन व अ‍ॅडमिशन सेवा दिल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या करिअरची दिशा ठरवावी, असे आवाहन केले. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात अशा प्रकारचे मार्गदर्शन केंद्र सुरू होणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button