गोंदियाविदर्भ

निवडणूक पोलिस निरीक्षक जे. एलनचेजियन यांची संवेदनशील पोलिंग स्टेशनला भेट

गोंदिया : 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक पोलिस निरीक्षक जे. एलनचेजियन यानी गोंदिया ग्रामीण पोलिंग स्टेशन अंतर्गत दूर्री, गर्रा व रावणवाडी या संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या पोलिंग स्टेशन येथे भेट देवून पाहणी केली.

निवडणूक पोलिस निरीक्षक जे. एलनचेजियन यांनी यावेळी आदर्श आचारसंहिता बाबत संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या. यावेळी पोलिस उपअधिक्षक रोहीणी बनकर, पोलिस निरीक्षक गोंदिया ग्रामिण पोलिस स्टेशन काळे, पोलिस निरीक्षक रावणवाडी पोलिस स्टेशन वैभव पवार, समन्वय अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार व इतर पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button