
जिल्ह्यात रांगोळी उपक्रमाची प्रशंसा ; आकर्षक रांगोळ्यांनी वेधले लक्ष
गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 यासाठी गोंदिया जिल्ह्यात अधिकाधिक मतदान होण्याकरिता जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या नियोजनाने स्वीप कार्यक्रमांतर्गत राणी अवन्तीबाई चौक, डॉमिनोज, प्रशासकीय इमारत, रेस्ट हाऊस येथे कर्मचाऱ्यांकडून आकर्षक रांगोळी काढण्यात आली.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी रांगोळी उपक्रमाची प्रशंसा करून लोकशाहीचा पर्वामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी एम. मुरुंगानंथम यांनी मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणूक 2024 ला मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा जास्त वाढविण्याचे आवाहन केले तसेच सर्वानीच मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असे यावेळी सांगितले. तसेच नियोजनबद्ध पद्धतीने स्वीप आराखडा कार्यक्रम तयार करण्याचे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सांगितले.
जिल्हात गोरेगाव, देवरी, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, तिरोडा शहरात विविध ठिकाणी बी.डी.ओ, तालुका नोडल अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियोजनाने कर्मचाऱ्यांकडून आकर्षक रांगोळी काढण्यात आली.
गोंदियाचे निवडणुक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाइत, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुनकुमार शहारे, उपविभागीय अधिकारी तिरोडा पूजा गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड तसेच स्वीप सह. नोडल अधिकारी महेंद्र गजभिये, शिखा पिपलेवार, महेंद्र गणवीर तहसीलदार, तहसीलदार मोनिका कांबळे, तहसीलदार समसेर पठाण, नारायण ठाकरे, प्रज्ञा भोकरे, प्रदीप समरीत तालुका स्वीप नोडल अधिकारी, विनोद चौधरी तालुका स्वीप नोडल अधिकारी तिरोडा, स्वाती तायडे तालुका स्वीप नोडल अधिकारी, गिरीधर सिंगनजोडे तालुका स्वीप नोडल अधिकारी, राहूल परिहार आदी यावेळी उपस्थित होते.



