क्राईमभंडारामहाराष्ट्रविदर्भ

महसूल पथकाने जप्त केला ८० ब्रास अवैध रेतीसाठा

भंडारा : बेटाळा रेती घाटावरून अवैधपणे रेती काढून ठेवण्यात आलेला ८० ब्रास रेती साठा महसूल पथकाने जप्त करून शासकीय रेती डेपोत जमा केला. मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथुन वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून अवैध रेती वाहतूक करण्यासाठी काढून ठेवण्यात आलेला ८० ब्रास रेती साठा महसूल विभागाच्या गस्ती पथकाच्या नजरेस पडला. मोजमाप करून हा संपूर्ण रेतीसाठा तेथून उचलून शासकीय रेती डेपोमध्ये जमा करण्यात आला.

वैनगंगा नदीपात्रातील पांढरी शुभ्र व बारीक रेती नागपूर येथे प्रसिद्ध असून या रेतीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या रेतीला तेथे सोन्यासारखा भाव मिळत असल्याने येथील रेती माफिया प्रशासनाला हुलकावणी देत नदीपात्रातील पांढरी शुभ्र रेती काढून काठावर डम्पिंग करतात नंतर ही रेती ट्रक, टिप्परच्या साह्याने, नागपूर, वर्धा, अमरावतीकडे पाठविली जाते.

ही कारवाई नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार यांच्या आदेशान्वये तलाठी विकास कदम बेटाळा, तलाठी कार्तिक सिरसकर निलज, कोतवाल चंद्रकुमार नंदनवार, कोतवाल आरिफ शेख व चालक कृष्णा भोयर यांनी केली. या कारवाईमुळे रेती चोरांचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button