
भंडारा : विधानसभा निवडणूक कार्यासाठी नियोजन भवनाच्या तळमजल्यावर एकत्रित कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये आचारसंहिता कक्ष, तसेच माध्यम प्रमाणीकरण कक्ष तसेच 1950 कक्ष आणि सी व्हिजील कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते निवडणुक विषयक कार्य कक्षाला भेट दिली जिल्हाधिका-यांनी सर्व कक्षांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे तसेच जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.



