गडचिरोलीविदर्भ

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घ्यावा – अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार

गडचिरोली येथे तालुकास्तरीय कार्यशाळा

गडचिरोली : ग्रामविकास विभागाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये “मुख्यमंत्री पंचायत राज अभियान” राबविल्या जात आहे. यामध्ये सर्वय ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी समन्वय साधुन गावाचा लोकसहभाग मिळवून गावात विविध विकास कामे करावी. तसेच या अभियानात क्रमांक मिळवून लाखो रुपयांची बक्षीसे जिंकावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले.

राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर 2025 या काळात राबविण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायतींना कोट्यवधीची बक्षिसे दिली जातील. याकरीता समाजकल्याण सभागृह येथे 10 सप्टेंबर रोजी “मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान” अंतर्गत एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जिप अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार होते. विशेष अतिथी म्हणुन सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा गट विकास अधिकारी अनिकेत पाटील, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार चंदु प्रधान, सहाय्यक गट विकास अधिकारी लिलाधर बेडके उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनिकेत पाटील म्हणाले की, प्रत्येक गावात पायभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, गावात उपलब्ध संसाधनांचा वापर करून ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व सदस्य यांनी प्रशासनाची मदत घेऊन गावाच सर्वांगिण विकास साधावा. तसेच तिव्र ईच्छाशक्ती ठेवून ईतर आदर्श ग्रामपंचायत प्रमाणे गडचिरोली तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत आदर्श करून प्रत्येक गाव सर्व सोई सुविधायुक्त समृध्द होईल याकरीता प्रयत्न करावे.

समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन मडावी म्हणाले की, मी स्वत: सरपंच राहीलो आहे, आणि सरपंच यांनी संय्यम ठेऊन गावात कार्य करीत राहावे, सरपंच हे जबाबदार व्यक्ती असून सरपंच यांनी ठरवल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो. असे ते म्हणाले. नायब तहसिलदार चंदु प्रधान यांनी सदर कार्यशाळेत पांदण रस्त्याच्या अडचणी व आता पर्यंत लोकसहभागातुन केलेली कामे, यावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच या अभियानामध्ये प्रत्येक गावात शिवार फेरी काढून पांदन रस्त्यांना क्रमांक व नावे देण्यासाठी महुसल विभाग मदत करणारे असे आश्वासन दिले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना विभाग आणि राज्यस्तरावर विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात देखील येणार आहे. ग्रामपंचायत स्तर: प्रथम क्रमांक – रु. १५ लाख, द्वितीय – रु. १२ लाख, तृतीय – रु. ८ लाख. जिल्हास्तर: प्रथम क्रमांक – रु. ५० लाख, द्वितीय – रु. ३० लाख, तृतीय – रु. २० लाख. विभागस्तर: प्रथम क्रमांक – रु. १ कोटी, द्वितीय – रु. ८० लाख, तृतीय – रु. ६० लाख. राज्यस्तर: प्रथम क्रमांक – रु. ५ कोटी, द्वितीय – रु. ३ कोटी, तृतीय पुरस्कार २ कोटी रुपयांचा मिळणार आहे.

सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृध्द, स्वच्छ व हिरवे गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमिकरण, उजजिवीका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानच्या माध्यमातुन नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणे. याविविध घटकांवर विशेष समिती मार्फत तपासणी करून गुणांकन केले जाणार आहे. क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button