गडचिरोलीविदर्भ

पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

गोकुलनगर येथील घटना ; इसम गंभीर जखमी

गडचिरोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या गोकुलनगर येथे पाण्याच्या टाकी वरून उडी घेऊन एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला जिल्हा रुग्णालयमधे भरती करण्यात आले आहे. गुड्डू तुंगीडवार असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्याची स्थिती गंभीर आहे. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा काही लोकांनी याच पाण्याच्या टाकीवरून उडी मारायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा या टाकीला संरक्षण भिंत बांधलेली नव्हती. नंतर भिंत बांधण्यात आली. परंतु भिंत च गेटला कुलूप लावलेले नाही. आहे. गेट नेहमी खुले असते. नियमाप्रमाणे जो कोणी कर्मचारी तिथे पाणी सोडायला जातो त्याने तिथून परत जाताना कुलूप लावून ठेवायला पाहिजे. परंतु तिथे गेट खुले ठेवण्यात येते. कोणीही आत जाऊन टाकीवर चढू शकतो.

काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. गडचिरोलीच्या वृद्धाश्रमाजवळच पाण्याच्या टाकीमधे एक व्यक्ती मरून होता. त्याचा मृतदेह पाण्यात सडत होता आणि त्या टाकीतून आलेले पाणी लोकांना प्यावे लागले होते. ही घटना माहित होताच अनेकांनी आपल्या घरातले पाणी फेकून दिले. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. अशा भयंकर घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नगर पालिकेने या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. पाण्याच्या टाकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने गेटला कुलूप लावून ठेवावे आणि नागरिकांच्या जिवांशी खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठीण कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button