भंडाराविदर्भ

दुचाकीसाठी पैसे दिले नाही म्हणून युवकाने घेतला गळफास

लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली गावातील घटना

भंडारा : आईने दुचाकी घेण्यासाठी पैसे न दिल्याने २१ वर्षीय युवकाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ३० ऑक्टोबरच्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास डांभेविरली गावात घडली. विजय प्रल्हाद ठेंगरी असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिस सूत्रानुसार, विजय व त्याची आई प्रमिला असे दोघेच कुटुंबात राहत होते. विजयच्या भाचीची प्रकृती बरी नसल्याने त्याची बहीण तिच्या मुलांसह मागील ५-६ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विजय मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्याने आपल्या आईला दुचाकी घेण्यासाठी पैसे मागितले. आईने माझ्याकडे आता पैसे नाहीत, माझ्या बँक खात्यात किती पैसे आहेत ते काढ आणि नंतर गाडी घे, असे सांगितले. मात्र विजयने आईला व बहिणीला घराबाहेर काढले व आतून घराचा दरवाजा बंद केला, आई व बहीण घरात येऊ नये म्हणून त्याने दारामागे लोखंडी पलंग लावला. विजयच्या आईने व बहिणीने जोराने ढकलून दरवाजा उघडला असता स्वयंपाक खोलीत गॅसच्या ओट्याजवळ लाकडी फाट्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसला.

हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी गावकऱ्यांना आणि लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक तानाजी रायपुरे व पोलिस नायक सुभाष शहारे आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button