क्राईमगोंदियाविदर्भ

रेती तस्करांनी इसमावर केला प्राणघातक हल्ला

किन्ही रेती घाट परिसरातील घटना

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू आहे. महसूल तसेच पोलिस प्रशासनाकडून अवैध रेती तस्करी करणाऱ्यावर कारवाई होत असली तरी त्या कारवाईला न जुमानता रेती तस्करांचा बोलबाला सुरू आहे. अशातच गोंदिया तालुक्यातील किन्ही रेती घाट परिसरात रेती तस्करांनी एका इसमावर प्राणघातक हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सविस्तर असे की, रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत रस्त्यावर नाली का खोदली या कारणाने लोखंडी साहित्य व काठीने मारून फिर्यादीला जखमी केल्याची घटना १ मार्चची आहे. आरोपी राजू तिवारी याने १० ते १५ लोक जमवून किन्ही रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाली का खोदली या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आशिष कनिराम खरे (२१) रा. किन्ही याला लोखंडी सळई व काठीने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सपोनि. सुनिल अंबुले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button