
महसूल विभागाची कारवाई
धानोरा : तालुक्यातील मुरूमगाव येथे नदी घाटात अवैधपणे रेती उपसा करणारे जेसीबी व एक ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केले. २ मार्च रोजी रात्री ११ वाजता ही कारवाई केली.
मुरूमगाव येथे अवैधपणे रेती उपसा होत असल्याच्या गुप्त सूचनेवरून महसूल विभागाच्या पथकाने नदी घाटात धाड टाकली. त्यावेळी तेथे एक जेसीबी व एक ट्रॅक्टर रेतीचा अवैध उपसा करताना दिसून आले. सदर जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. जेसीबी सागर हरिराम कवाडकर (रा. मुरुमगाव) व ट्रॅक्टर रुपेश सोमसिंग हिडको (रा. रामपूर) यांच्या मालकीचा आहे. ही कारवाई तहसीलदार अविनाश शेंबटवाड, नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे, तलाठी दिलीप डोंगरे, वाहन चालक आशिष पोरेड्डीवार व महसूल सेवक आशिष पोरेटी पथकाने केली.



