
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार वितरण
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक रोहित बापू कांबळे यांना २०१९ सालचा राज्य शासनाचा शासकीय गटातील राज्यस्तरीय ‘केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख ५१ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयामध्ये छायाचित्रकार या पदावर कार्यरत असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे हेलिकॉप्टरमधून केलेले छायाचित्रण तसेच इतर विकासात्मक उल्लेखनीय छायाचित्रांसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
लवकरच मुंबईत होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारामुळे रोहित कांबळे यांच्या छायाचित्रण क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली गेली आहे.



