क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

धान घोटाळा ; टीडीसीचे व्यवस्थापक मुरलीधर बावणे निलंबित

दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या रडारवर 

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांना अखेर आदिवासी विकास महामंडळाने (नाशिक) दि.21 एप्रिल रोजी निलंबित केले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बन्सोड यांनी यासंदर्भातील आदेश काढला. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावच्या हद्दीतील अरततोंडी आणि शिरपूर येथे दोन वर्षात झालेल्या धानाच्या अफरातफरप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

या अफरातफर प्रकरणी तक्रार प्राप्त होताच दि.19 रोजी आदिवासी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक मुरलीधर बावणे, आविका संस्थेचा सचिव महेंद्र मेश्राम यांच्यासह विपणन अधिकारी आणि केंद्रावरील सोसायटीचे कर्मचारी अशा 17 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यातील ग्रेडर चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर (39 वर्षे) आणि हितेश पेंदाम या दोघांना लगेच अटकही करण्यात आली. मात्र इतर आरोपींना अद्याप ताब्यात घेतलेले नाही.

या प्रकरणात टीडीचे उपव्यव्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेचा सचिव महेंद्र मेश्राम यांना मुख्य आरोपी करण्यात आले. मात्र तेव्हापासून ते पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच ते ताब्यात येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सन 2023-24 आणि 2024-25 या दोन्ही वित्तीय वर्षात मिळून एकूण 3 कोटी 96 लाख 65 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी पोनि.महेंद्र वाघ करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button