गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयाची एसएससी परीक्षेत शानदार कामगिरी ; कॅडेट मास्टर समर खोबे ९६ टक्क्यांसह अव्वल

शंभर टक्के निकालासह २६ विद्यार्थ्यांची विशेष प्रावीण्य श्रेणीत झेप

गडचिरोली : येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी (इयत्ता दहावी) नागपूर बोर्डाच्या परीक्षेत नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट यश संपादन केले आहे. नुकताच जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालामध्ये विद्यालयाने शंभर टक्के निकाल नोंदवला असून, विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण प्रदर्शन केले आहे.

विद्यालयाचा विद्यार्थी कॅडेट मास्टर समर मनोज खोबे याने ९६.०० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पार्थव नितीश मजुमदार (९१.८० टक्के), अर्पित प्रमोद भोगेकर (९१.६० टक्के), अथर्व निलेश लोणकर (९१.०० टक्के), सिद्धार्थ श्रीनिवास कुमरी (९०.४० टक्के), सार्थक किशोर शेडमाके (९०.२० टक्के), श्रीहर्ष अनिल बुधबावरे (८९.८० टक्के), नीलकमल भास्कर सोमणकर (८९.८० टक्के), हर्षित मनोज काळे (८८.८० टक्के), खुश प्रमोद कुमोटी (८८.२० टक्के), प्रेम निजान पेंदाम (८६.८० टक्के) आणि सुशांत शिवप्रसाद कुमरे (८५.८० टक्के) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले आहेत.

विशेष बाब म्हणजे, विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीत (डिस्टिंक्शन) यश मिळवले आहे, तर उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या शानदार यशाबद्दल संस्थेचे सचिव धर्मरावबाबा आत्राम, संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयाच्या या उत्कृष्ट निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button