गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या पंढरपूर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण

१५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे राज्य शिखर अधिवेशन

गडचिरोली : ‘व्हाईस ऑफ मीडिया’ (Voice of Media) आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शिखर अधिवेशनाच्या (State Summit Convention) लोगोचे अनावरण गडचिरोली येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

आमदार डॉ. नरोटे यांच्या कार्यालयात हा अनावरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आणि पदाधिकारी अनिल पोहनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, शहर कार्यकारिणी सरचिटणीस निलेश सातपुते आणि जिल्हा पदाधिकारी उदय धकाते उपस्थित होते.

या कार्यक्रमात आगामी राज्य अधिवेशनाच्या आयोजनाची रूपरेषा, पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी उपक्रम आणि समाजात सकारात्मक पत्रकारितेची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘व्हाईस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन नियोजित वेळापत्रकानुसार १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. राज्यभरातील पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधी या महत्त्वपूर्ण अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button