
अहेरीच्या राजघाटवर अंत्यविधी ; मुलगा नारायणरावबाबा आत्राम दिला भडाग्नी
अहेरी : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व.हरिशचंद्रराव बाबा आत्राम यांच्या अर्धांगिनी तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची भावसून चंद्रप्रभादेवी आत्राम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी दुःखद निधन झाले.
शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान अहेरी येथील राजघाटवर आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. मुलगा नारायणराव बाबा आत्राम यांनी पार्थिवेला चिताग्नी दिली.
यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, रविंद्रबाबा आत्राम, युवराज अवधेशरावबाबा आत्राम, किष्किंद्रराव बाबा आत्राम, हर्षवर्धनराव बाबा आत्राम, रामेश्वरराव बाबा आत्राम, विश्वनाथराव बाबा आत्राम आदी राजपरिवारातील सदस्य व नातेवाईक होते. असंख्यानी पार्थिवाचे दर्शन घेऊन हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली वाहिले. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील बहुसंख्य मंडळी, अहेरी उपविभागातील व अहेरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यविधीत सामील होते. चंद्रप्रभादेवी आत्राम यांच्या निधनाने अहेरीत शोककळा पसरली.



