गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अहेरी जिल्हा बनविण्याचा संकल्प घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागा – अम्ब्रीशराव आत्राम यांचे आवाहन

सिरोंचा येथे पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक

सिरोंचा : माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अहेरी, एटापल्ली, मूलचेरा, भामरागड तालुकानिहाय बैठका घेतल्या. सर्वच तालुक्यात भाजपाचे प्रमुख पदाधिकारी ते सामान्य कार्यकर्ते अम्ब्रीशराव आत्राम यांच्या बाजुने भक्कमपणे साथ देताना दिसत आहे. सिरोंचा येथे ०७ सप्टेंबर रोजी आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्या बैठकीत केवळ पदाधिकारी, कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य जनतेनी सुध्दा आत्राम यांचे ऊत्स्फुर्त, अभुतपुर्व स्वागत केले. तालुक्यातील कानाकोपर्‍यातुन आलेल्या जनतेच्या मोठ्या संख्येने स्वयंस्फुर्त हजेरीमुळे पदाधिकारी बैठकीचे रुपांतर जवळपास जाहीर सभेतच झाले. राजे आत्राम काय बोलणार? आगामी निवडणुकीत काय भुमिका घेणार हे जाणुन घ्यायला तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून चाहतावर्ग उपस्थित झाला होता.

ऊपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, आपल्या कारकीर्दीत मोठमोठी अशक्यप्राय कामे करुन दाखविली, नवीन अहेरी जिल्ह्याची निर्मिती करणे हे माझे स्वप्न असून वेळ आल्यास त्यासाठी रस्तावरही उतरायला मी तयार आहे. अहेरी जिल्ह्याच्या निर्मीतीचे काम सुध्दा अंतिम टप्प्यात आले होते, परंतू मागील विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे ते मागे पडले. आगामी काळात प्राधान्याने हा विषय मार्गी लावणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. तसेच हाच संकल्प घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीचा तयारीला लागा असे आवाहन आत्राम यांनी केले. कोणत्याही आमिषांना बळी न पडता विकासाचा आणि भवितव्याचा विचार करावा आणि त्यांच्या कारकिर्दीत ह्या क्षेत्रात केलेल्या विकासकामांचा पाढाच अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाचला. त्याकाळात तालुक्यातील सर्वच भागात अभुतपुर्व विकासकामे झालीत मात्र गड्डे बुजवणार असे पोकळ गर्जना करणार्‍यांनी आत्ता रस्ताच शिल्लक कुठे ठेवला नसल्याचा टोलाही त्यांनी मारला.

विकासकामांची कंत्राटे, तेंदूपत्ता, रेती इ. सर्वांची ठेकेदारी मंत्री साहेबांचे कुटूंबीयच करताना दिसतात हाच विकासाचा माॅडेल होता काय? असा खोचक सवाल ही केला. मंत्री साहेबांनी कित्येक निवडणुका हीच शेवटची निवडणूक असे सांगत लढविल्या आणि आज मंत्रिपदही ऊपभोगायला मिळाले. मुलीला संधी देणार असल्याचे वारंवार सागुन शेवटी स्वतःच ऊभे राहणार असल्याची घोषणा करतांना सत्तेचा मोह दिसतो. जनतेचे भले व्हावे,परिसराचा विकास व्हावा याचे मात्र सोयरसुतक त्यांना नाही अशी टिका अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमाला सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button