गडचिरोलीविदर्भ

मालेवाडा येथे रक्तदान शिबीर ; ८६ नागरिकांनी केले रक्तदान

कुरखेडा : संत निरंकारी मंडळ, शाखा मालेवाडाच्या वतीने २८ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, मालेवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 82 पुरुष व 4 महिला असे एकूण 86 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे रक्तटंचाई झाल्यामुळे त्यांनी मंडळाला विनंती करताच मानवसेवेसाठी संत निरंकारी मंडळाद्वारे तातडीने मालेवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

शिबीराचे उ‌द्घाटन संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य मिता कुमरे, मंडळाचे क्षेत्रीय संचालक हशिष निरंकारी, कन्हैयालाल डेंगानी, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक धनगम, उपसरपंच बोगा, डॉ. उंदिरवाडे, शेडमाके, मेश नंदनवार, सुभाष गुंडरे, सुरेखा वनस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनपर संबोधनात किशन नागदेवे यांनी रक्तदान हे परोपकाराद्वारे कर्मा ने ईश्वर भक्ती असून या सत्कर्माद्वारे रक्तदात्याला अंतर आत्माला जो समाधान मिळतो तो ईश्वराचा आशीर्वादच आहे, असे मत व्यक्त केले.

संत निरंकारी मंडळाद्वारे दरवर्षी वडसा, कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी, आष्टी इ. शाखेमध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करून जवळपास 800-1000 युनीट रक्तदान केले जातो. मानव सेवेसाठी समर्पित संत निरंकारी मंडळा हो स्वच्छता इ. असे अनेक समाजसवेचे कार्य निस्वार्थ, समर्पण भावनेने केले जातात.

मान्यवरांचे हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. रक्त संकलनासाठी रक्तपेढी, जिल्हा रूग्णालय, गडचिरोली यांचे सर्व चमू यांनी परिश्रम घेतले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी कृष्णा किंचक, कार्तीक धकाते व सर्व महीला-पुरुष सेवादल सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button