गडचिरोलीविदर्भ

कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार – आ. डॉ. देवराव होळी

भाजपा, शिवसेना पदाधिकारी व होळी समर्थकांनी केले ढोल, ताशे फटाके व  पुष्प वर्षावासह केले जंगी स्वागत

आ. डॉ. देवराव होळी यांचे गडचिरोलीत जंगी स्वागत

गडचिरोली : पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मुंबईवरून गडचिरोली येथे प्रथमच आगमन केलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना व होळी मित्र परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील निवडणुकीत हरलेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली.  आपल्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवून आपली उमेदवारी रद्द केली.  त्यामुळे आपण अतिशय दुःखी झालो असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथे आगमना प्रित्यर्थ आयोजित स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक लौकिक भिवापूरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विवेक ब्राह्मणवाडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे, भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी,  भाजपाच्या शहराच्या अध्यक्ष कविता उरकुडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा उपस्थित होते.

यावेळी उपस्थित समर्थकांनी आम्ही होळी समर्थक असे फलक दाखवून डॉ. देवराव होळी यांना आपले समर्थन दाखवले. यावेळी बोलताना आ. डॉक्टर देवराव होळी म्हणाले की, आपल्या विरोधात भाजपाच्याच काही लोकांनी मोठे षडयंत्र रचले असुन भारतीय जनता पार्टीला संपवण्याच्या दिशेने नेत असल्याचे त्यावरून दिसून येते. आपला काहीही दोष नसताना पार्टी विरोधामध्ये आपण कोणत्याही प्रकारे काम केलेले नसताना देखील केवळ आपली उमेदवारी रद्द करण्याकरिता खोट्या बातम्या वरिष्ठांना सांगून आपली उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही हे आपण कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मी मान्य कारेन. त्यासाठीच मी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, पारडीचे सरपंच संजय निखारे, माजी सभापती मारोतराव ईचोडकर, युवा सेनेचे दीपक भारसाकडे, शिवसेनेचे हेमंत भाऊ जम्बेवार यांनी मार्गदर्शन करून आपण होळी साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट करीत आमदार साहेब जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून असे आश्वासन आमदार महोदयांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button