गडचिरोलीमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईविदर्भ

गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीस करणार एलएमईएलच्या स्टील प्रकल्पाचा शिलान्यास

विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ; हेडरी येथे आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांटचेही उद्घाटन

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत. २२ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) क्षमतेच्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. हा प्रकल्प विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ठरणार आहे.

कोनसरी येथील स्टील प्रकल्पाच्या शिलान्यास सोहळ्यासोबतच, त्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हेडरी येथे उभारण्यात आलेल्या ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांटचेही उद्घाटन होणार आहे. एलएमईएलने हा प्रकल्प केवळ एका वर्षात पूर्ण करून कार्यान्वित केला आहे, हे विशेष.

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी याबद्दल बोलताना म्हटले, “गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्रकल्पाची पायाभरणी होत आहे. हे एक ऐतिहासिक स्वप्न साकार होण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”

या सोहळ्यात १० दशलक्ष टन प्रतिवर्ष (MTPA) क्षमतेच्या स्लरी पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटनही होणार आहे. ही पाइपलाइन महाराष्ट्रातील पहिली कार्यरत लोखंड स्लरी पाइपलाइन ठरणार आहे. हेडरी ते कोन्सारी अशी ८५ किमी लांबीची पॅलेट प्लांट दरम्यान असलेली ही पाइपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, या पाइपलाइनमुळे कार्बन उत्सर्जनात ५५ टक्के घट होईल आणि संपूर्ण प्रकल्पाच्या दळणवळणाची कार्यक्षमता वाढेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button