गडचिरोलीविदर्भ

दिव्यांग बालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिर

गडचिरोलीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र व आयुष्मान कार्डचे वाटप

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बालकांसाठी विशेष ओळख-तपासणी शिबिर आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दिव्यांग बालकांना शासकीय योजनांशी जोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात (OPD) शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्ही. आर. जोशी हे होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंकी, सचिव (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) अं. पुं. खानोरकर, श्वसन विकार तज्ञ मनीष मेश्राम आणि बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत पेंदाम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात व्ही. आर. जोशी यांनी उपस्थित दिव्यांग बालकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ कसा मिळवता येईल आणि त्यांना विविध योजनांशी जोडण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, यावर सखोल मार्गदर्शन केले.

या विशेष शिबिरामध्ये विविध शाळांतील १३ दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रे आणि ०५ आयुष्मान भारत कार्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बालकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या कायदेशीर सेवा आणि योजनांची माहिती देण्यावर भर देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button