
मालेवाडा : ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेवाडा येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी होते. मार्गदर्शन प्रा. दिलीप नंदेश्वर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एच. आय. राऊत व डॉ. पी. एस. काळे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी यांनी वाढती लोकसंख्या, तिचे सामाजिक व आर्थिक परिणाम, कुटुंब नियोजन, आरोग्य, शिक्षण आणि शाश्वत विकासासाठी लोकसंख्या संतुलनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यदायी समाजनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका स्पष्ट केली. प्रा. दिलीप नंदेश्वर यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे उद्दिष्ट सांगून विद्यार्थ्यांनी समाजात लोकसंख्या विषयक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रकाश वैद्य, प्रा. डॉ. वर्षा ठाकरे, प्रा. कुलदीप ठाकूर, प्रा. सुधाकर शहारे, प्रा. एच. एम. शहारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद आर. कुमरे यांनी केले, तर आभार प्रा. भगत नुरुटी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



