क्राईमभंडाराविदर्भ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला पोक्सोअंर्तगत अटक

साकोली : गोंदिया जिल्ह्यातील आरोपीने भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केला. यातून ती १९ महिन्यांची गर्भवती राहिली. रुग्णालयात गेल्यावर हा प्रकार उघड झाल्याने मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमा लावून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाखनी तालुक्यातील बाराव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे नातेवाइकाकडे वाढदिवसाकरिता गेली असता कार्यक्रमात तिची विनोद सुरेश गळे (२८) याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. तो अल्पवयीन मुलीला भेटण्याकरिता तिच्या शाळेत येऊन भेटत असे. अशातच एकदा दुचाकीवरून साकोलीतील एका लॉजवर नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. अलिकडे मुलीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी लाखनी येथील खासगी रुग्णालयात तपासणी केली असता ती १९ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासात आढळून आले. पीडिता अल्पवयीन असल्याने व घटनास्थळ साकोली असल्याने येथील पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button