गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गौरव कावळे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

गडचिरोली : जिल्हा नियोजन समिती सभागृह, गडचिरोली येथे ०५ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024-25 तसेच मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा टप्पा एक याचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खा. डॉ. नामदेवराव किरसान, जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, माजी आ. हरिराम वरखडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एम. भुयार, शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्रथा.) बाबासाहेब पवार, उपस्थित होते.

कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण 13 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आला. यामध्ये पंचायत समिती कोरची येथील बेळगाव केंद्रांतर्गत प्रा. शाळा टाहकाटोला येथील शिक्षक गौरव कृष्णराव कावळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते हा पुरस्कार कावळे यांना प्राप्त झाला. पंधरा वर्षापासून गौरव कावळे टाहकाटोला शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या पुरस्कारानंतर लगेचच मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये टाहकाटोला या शाळेने जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला व पुन्हा एकदा या शाळेचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले. आपल्या अथक परिश्रमाने शिक्षक कावळे यांनी लोकसहभागातून आपल्या शाळेला तिथपर्यंत पोहोचवले याबद्दल सर्व तालुक्याच्या वतीने शिक्षक कावळे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button