गडचिरोलीविदर्भ

दुचाकी झाडावर धडकून भीषण अपघात, एक ठार

नगरी फाट्यानजीकची घटना

गडचिरोली : शहराजवळील नगरी फाट्यानजीक भरधाव दुचाकी झाडावर धडकली, यात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. फुलबार भरत गिरी (वय ५९, रा. नवीन लाडज ता. देसाईगंज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

ते कामानिमित्त दुचाकीवरुन (एमएच ३३ एजे- ३०६३) राजुरा (जि. चंद्रपूर) येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते देसाईगंजकडे परतत होते. नगरीजवळ त्यांचा ताबा सुटला, दुचाकी रस्त्याखाली जाऊन झाडावर आदळली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ते खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत गिरी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात आकाश देवळे यांच्या जबाबावरून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पो.नि.विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात हवालदार मुकेश बिके करीत आहेत.

आरमोरी मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. मात्र, हे काम लालफितीच्या कारभारात रखडले आहे. सध्या एकेरी मार्ग असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. परिणामी अपघातांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. फुलबार गिरी यांचा जिथे अपघात झाला तेथून हाकेच्या अंतरावर यापूर्वी व्यायामासाठी आलेल्या चार युवकांचा मृत्यू झाला होता. अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button