गडचिरोलीविदर्भ

१२० युवकांनी घेतले पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारोप संपन्न

जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाने पोलीस भरतीला सामोरे जा – अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश

गडचिरोली : जिल्ह्यातील गरजु युवक-युवतींना पोलीस दलात रोजगाराची संधी देवून नोकरी मिळविणे करीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील युवतींकरीता पोलीस भरती पुर्व निवासी प्रशिक्षणाचे आयोजन गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांचे निरोप समारंभ कार्यक्रम एकलव्य धाम, गडचिरोली येथे पार पाडण्यात आला.

सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण ०५ डिसेंबर २०२४ ते ०४ जानेवारी २०२५ पर्यंत एकूण ३० दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या १० व्या सत्रामध्ये १२० युवकांनी आपला सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालय तसेच पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण २०८० युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामधुन २०५ जणांची पोलीस/एसआरपीएफ मध्ये निवड झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचे वतीने लोअर, टी-शर्ट, शुज, लेखी परीक्षेकरीता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या या निरोप समारंभ कार्यक्रमास पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण घेतलेले १२० प्रशिक्षणार्थी उमेदवार हजर होते. या प्रशिक्षणा अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या युवकांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून मा. वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यादरम्यान प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त करून गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहे.

सदर समारोपीय कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आगामी पोलीस भरतीमध्ये जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने परिश्रम करुन यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच योगेंद्र शेंडे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग गडचिरोली यांनी देखिल सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, सर्व पोलीस अंमलदार व कवायत निर्देशक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button