गोंदियाविदर्भ

२०० क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’चे वितरण ; आ. विनोद अग्रवाल यांचा पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर आरोग्य सप्ताह; निक्षय मित्र बनून मदतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांचे आवाहन

गोंदिया : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै दरम्यान राज्यभरात विशेष आरोग्य सप्ताह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आणि जनआरोग्य समितीच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे व वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून ‘प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियाना’अंतर्गत गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने गोंदिया तालुक्यातील तब्बल २०० क्षयरुग्णांना (टीबी रुग्ण) मोफत ‘फूड बास्केट’चे वितरण करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहित २७ व २८ जुलै रोजी हा उपक्रम पार पडला. गोंदिया तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील पात्र २०० क्षयरुग्णांना हे पोषक आहाराचे किट सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी गोंदियातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले. “क्षयरोगाच्या उपचारात औषधांइतकाच पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. समाजातील दानशूर व्यक्तींनी ‘निक्षय मित्र’ बनून गरजू व गरीब क्षयरुग्णांना मदतीचा हात द्यावा, जेणेकरून गोंदिया जिल्हा टीबीमुक्त होण्यास गती मिळेल.” असेही ते म्हणाले.

क्षयरुग्णांसाठी ‘फूड बास्केट‘चे महत्त्व व फायदे:

रोगप्रतिकारशक्ती बळकट करणे: टीबीच्या जंतूंशी लढण्यासाठी शरीराला प्रथिनांची (Proteins) आणि जीवनसत्त्वांची गरज असते. किटमधील कडधान्ये, शेंगदाणे, अंडी व दूध यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. औषधांचे दुष्परिणाम कमी करणे: टीबीची औषधे कडक असल्याने येणारा थकवा व मळमळ दूर होण्यास पौष्टिक आहारामुळे मदत होते. वजन व ऊर्जा पूर्ववत करणे: आजारपणात घटलेले वजन नियंत्रित आणून रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत होते. उपचारात सातत्य राहणे: आर्थिक अडचणींमुळे कोणीही उपाशीपोटी औषधे सोडून देऊ नये, यासाठी खात्रीशीर अन्न मिळाल्याने रुग्ण उपचाराचा कोर्स पूर्ण करतात. कुटुंबाला आर्थिक आधार: आजारपणामुळे काम सुटलेल्या रुग्णांच्या कुटुंबावरील अन्नाचा व आर्थिक भार यामुळे मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button