गडचिरोलीविदर्भ

वाघभूमी परिसरात रानटी हत्तींचा हैदोस 

झोपड्यांची केली नासधूस ; नागरिक धास्तावले

धानोरा : तालुक्यात येणाऱ्या वाघभुमी, हुऱ्यालदंड परीसरात रानटी हत्तींनी मोठ्या प्रमाणात हैदोस माजविला असल्याने या भागातील नागरीक धास्तावले आहेत. या रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकातून केली जात आहे.

ओडीसा राज्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने गेल्या दोन वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात उपद्रव माजविणे सुरू केले आहे. गडचिरोली, धानोरा, कोरची, कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज या तालुक्यात रानटी हत्तींनी आतापर्यंत अनेकदा धुमाकुळ घालून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच अनेक नागरीकाचा जीवही घेतला आहे. सद्यास्थितीत याचनटी हत्तीच्या कळपाने धानोरा तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या वाघभूमी, हुऱ्यालदंड, येरमागड परीसरात आपला मोर्चा वळविला आहे.

येथील शेतकऱ्यांनी शेतात उभारलेल्या झोपड्या हत्तींनी उध्वस्त केल्या तसेच शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासधुस केली. आदिवासी नागरीक पावसाळयात पावसापासून बचाव करण्यासाठी शेतात झोपडी उभारतात. मात्र या हत्तींनी या झोपड्या ध्वस्त केल्याने आदिवासी नागरीकापुढे शेतात निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे वनविभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. परीसरात रानटी हत्तींना मोठ्या प्रमाणात खाद्य मिळत असल्याने हत्तींचे बस्तान कायम आहे. या हत्तींपासून नागरिकांना अपाय होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button