गडचिरोलीविदर्भ

महाराष्ट्राचे वैभव परत मिळविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

खोकेबाज, कमिशनखोर, गद्दारांना हद्दपार करा

काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनोहरराव पोरेटी यांना भरघोस मतांनी विजयी करा

चार्मोशी : महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणाऱ्या महायुतीला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी तसेच महाराष्ट्राचे वैभव परत मिळविण्यासाठी, मोदींच्या सत्तेला हादरा देण्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढले पाहिजे. आमदार विकत घेऊन खोकेबाजांची फौज निर्माण करणाऱ्या, चिन्ह पळवणाऱ्या, पक्ष पळवणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनोहरराव पोरेटी यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

चार्मोशी तालुक्यातील आष्टी, घोड, कुनघाडा येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनोहरराव पोरेटी यांच्या प्रचार सभेस वडेट्टीवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली.

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात चरणी अर्पण करण्याचे पाप महायुतीने केले. पैसे खाण्यासाठी किंमत वाढवून टेंडर काढले गेले. कमिशनखोरांची तिजोरी भरली. राज्याला अधोगतीकडे नेले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्याच्या कामात देखील कमिशन खाल्ले. जे सरकार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारताना भ्रष्टाचार करू शकते अशा सरकारमधील दगाबाजांना मत देणार का? असा सवाल त्यांनी केला.

आम्ही शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांसाठी योजना आणल्या. पाच गॅरंटी आणल्या. आम्ही योजना आणल्या तर फडणवीस म्हणतात आम्ही खोटे बोलतो. पण १५ लाख देणार सांगून १५०० रुपये फडणवीसांच्या विचारांचं सरकार देत आहे. तेव्हा ते सांगत होते अच्छे दिन येणार. पण अच्छे दिन आले नाहीत. महागाई कमी झाली नाही. या सरकारने १५०० रुपये दिले पण फोडणी महाग केली. वीज बिल वाढली. एका खिशात दिले दुसऱ्या खिशातून काढून घेतले असल्याची टीका त्यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीने धान, सोयाबीन, कापसाला दर दिला नाही. केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलचे भाव वाढवले. शेती अवजाराना जिएसटी आकारला. खतांच्या किंमती वाढवल्या. परिणामी या सरकारच्या काळात २० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. तरीही महायुतीच्या नेत्यांना दुःख नाही.

महायुतीने जातीजातीत भांडण लावले. आम्ही जातनिहाय जनगणना करू. आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्यावर वाढवू. काँग्रेसने मनोहरराव पोरेटी यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा काँग्रेस पक्षाने सन्मान केला आहे. आपल्या सर्वांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते तत्पर राहतील. तुम्ही अडचणीच्या काळात कधीही त्यांचे दार ठोठावू शकता. आता त्यांना ताकद देण्यासाठी, महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी पोरेटी यांना भरगोस मतांनी विजयी करा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

खासदार डॉ. किरसान म्हणाले, आता प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. लोकसभेला आपण एकसंघ राहून काम केले. आपला प्रतिनिधी म्हणून मला भरघोस मतांनी निवडून दिले. तसेच या विधानसभा निवडणुकीत मनोहर पोरेटी यांना निवडणूक द्या. आपण एक आमदार माझ्या सोबतीला दिला तर या परिसराचा विकास अधिक गतीने होईल.

महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी म्हणाले, मी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्त म्हणून काम केले. १० वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. यापुढे मी आपला सेवक म्हणून काम करीन. या भागातील शेतमामाला भाव मिळवून देण्यासाठी माझे प्राधान्य राहील.

यावेळी कविता मोहरकर, विश्वजित कोवासे, डॉ. आशिष कोरेटी, विनय बारसागडे, माधव घरामी, रवी पाल, बाळाभाऊ येनगंटीवार, गोपाळ साबळे, भाऊराव चव्हाण, जे. डी. मंडल, संजय पंदीलवार, शालीकराम विधाते, काशिनाथ भडके, नितेश राठोड, रमेश चौधरी, नानाभाऊ पसपुलवार, बिजन सरदार, रविभाऊ शाह, शंकर आक्रेट्टीवार, रमेश कोडाप, विनय येलमुले, संतोष सोयाम, नितीन गद्देवार, सुमित तुरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button