गडचिरोलीनागपूरविदर्भ

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार गडचिरोली भूषण पुरस्काराने सन्मानित

नागपूर येथे पुरस्कार प्रदान ; अभिनेत्री उर्मिला कानिटकर, माजी खा. अशोक नेते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

गडचिरोली : नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट, रामदास पेठ येथे सोमवार, ३० जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास “गडचिरोली भूषण २०२५” या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना ‘गडचिरोली भूषण सन्मान २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.

या सन्मान सोहळ्याला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री उर्मिला कानिटकर, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूरचे सिद्धार्थ गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूरचे विनायक महामुनी, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव चटप, तसेच भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लाईकराम भंडारकर हे प्रमुख उपस्थित होते.

संतोष ताटीकोंडावार यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे शेकडो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आले आहेत. त्यांची समाजासाठी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची असून, त्यांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार उघड झाले आहेत, ज्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे आणि समाजाच्या हिताचे संरक्षण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button