गडचिरोलीमुख्य बातमीराजकीयविदर्भ

अहेरी विधानसभेत 12 उमेदवार रिंगणात, दोघांची माघार ; दोन्ही आघाड्यात बंडखोरीचे आव्हान…

अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सोमवारी नामांकन माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे आता 12 उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार अजय आत्राम व अवधेश राव आत्राम यांनी आपले नामांकन परत घेतले आहे.

आता रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम, बहुजन समाज पार्टीकडून रमेश गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप कोरेत, प्रहार जनशक्ती पक्षाकडून नीता तलांडी, अपक्ष अम्ब्रीशराव आत्राम, दीपक आत्राम, महेश कुमराम, शैलेश गेडाम, नितीन पदा, भाग्यश्री लेकामी, हनुमंतु मडावी यांनी आपले दावेदारी कायम ठेवली आहे.

काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार हनुमंत मडावी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यामुळे महा विकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. त्यासोबतच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केल्याने महायुतीत बंडखोरी झाली आहे. त्यासोबत नीता तलांडी ह्यांनी प्रहार जनशक्तीतर्फे उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

त्यामुळे अहेरी विधानसभेत एकीकडे वडील-मुलीत राजकीय संघर्ष पेटला असताना महायुती व महाविकास आघाडी पुढे बंडखोर उमेदवारांचे कडवे आव्हान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button